ग्रुप ग्रामपंचायत बुधावली-काटी

ग्रुप ग्रामपंचायत बुधावली–काटी हे महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात वसलेले एक निसर्गरम्य व आदिवासी बहुल गाव आहे. हे गाव डोंगररांगा, जंगल आणि शेतीने वेढलेले असून येथील लोक पारंपरिक जीवनशैली जपत राहतात. गावात वारली, कातकरी तसेच इतर आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात राहतात.सन २०११ च्या भारतीय जनगणनेनुसार बुधावली–काटी गावाची एकूण लोकसंख्या १२०२ आहे. त्यापैकी ५९० पुरुष तर ६१२ महिला आहेत. तसेच ० ते ६ वयोगटातील बालकांची संख्या सुमारे १४० इतकी आहे. गावामध्ये अनुसूचित जमाती (ST) समाजाचे प्रमाण जास्त असून सुमारे ९५० लोक अनुसूचित जमातीमध्ये मोडतात, तर अनुसूचित जाती (SC) समाजाची लोकसंख्या सुमारे ४० इतकी आहे. येथील लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती व शेतीमजुरी हा आहे. गावातील शेतकरी प्रामुख्याने भात, नागली, वरई तसेच भाजीपाला यांची लागवड करतात. काही लोक वनउत्पादने गोळा करणे, बांधकाम मजुरी, लहान व्यवसाय व हंगामी कामे करून आपला उदरनिर्वाह करतात. गावातील लोक परंपरेनुसार होळी, दिवाळी, ग्रामदेवता जत्रा तसेच आदिवासी पारंपरिक नृत्य उत्साहाने साजरे करतात.

लोकसंख्येची माहिती

क्रमांक क्षेत्र तपशील
एकूण लोकसंख्या
१२०२
पुरुष लोकसंख्या
५९०
महिला लोकसंख्या
६१२
०–६ वर्षे वयोगटातील लोकसंख्या
१४०
अनुसूचित जाती (SC %)
४०
अनुसूचित जमाती (ST %)
 ९५० 

उपलब्ध पायाभूत सुविधा

क्रमांक सुविधा प्रकार उपलब्ध (होय/नाही) संख्या रस्त्याने जोडलेले (होय/नाही)
ग्रामपंचायत कार्यालय होय होय
प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC)  नाही  –  होय 
उपकेंद्र (Sub Center) होय  १  होय 
अंगणवाडी  होय ३    होय
प्राथमिक शाळा होय  ३    होय
माध्यमिक शाळा  नाही  –   होय
उच्च माध्यमिक शाळा  नाही  –   होय
महाविद्यालय / व्यावसायिक केंद्र  नाही  –   होय
समुदाय भवन (Community Hall)  नाही  –   होय
१० स्वस्त दर दुकान (PDS)  होय १   होय 
११ श्मशानभूमी / स्मशानभूमी  होय   २  होय 
१२ इंटरनेट / मोबाईल टॉवर  नाही   – होय 
१३ सीएससी केंद्र (CSC Center) होय  १   होय 

प्रशासकीय संरचना

ग्रामपंचायत बँक माहिती

खाते नाव: GROUP GRAMPANCHAYAT BUDHAVALI KATI

बँकेचे नाव : ICICI BANK

शाखेचे नाव:  पालघर 

अकाउंट नंबर :  006201010600

आई एफ एस सी कोड : ICIC0000062

पत्ता : मु.पो.बुधावली ,ता. वाडा , जि.पालघर (४२१३१२)